वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) वणी नॉर्थ क्षेत्राच्या क्षेत्रीय रुग्णालय, भालर यांच्या वतीने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत विठ्ठलवाडी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १७० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरणही करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन आमदार संजयभाऊ देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी WCL चे जनरल मॅनेजर (ऑपरेशन) ओमप्रकाश फुलारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मारोती ठेंगणे, वणी कोल सायडिंगचे इन्चार्ज परियार सर, जितेंद्र प्रसाद (APM), कमानी (APM), पर्सनल ऑफिसर राकेश झ्याकी, नगरसेवक अजय पांडुरंग धोबे तसेच नगरसेविका प्रणाली गणेश देऊळकर उपस्थित होते.
शिबिरामध्ये डॉ. किशन, डॉ. मालवीका, डॉ. पवार, नरेश सर, संदीप वानखेडे तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने नागरिकांची तपासणी केली. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. तसेच आरोग्याबाबत जनजागृती व मार्गदर्शनही करण्यात आले. विठ्ठलवाडी व परिसरातील महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांनी WCL च्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारची आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची मागणी केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी WCL वणी नॉर्थ क्षेत्र, क्षेत्रीय रुग्णालय भालर, क्षेत्रीय मानव संसाधन विभाग आणि सहेली महिला समिती यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय विजय दोडके, आशिष रिंगोले, परिमल आंध्रसकर, प्रवीण पाचभाई, महेश खामणकर, प्रतीक खाडे, नागेश मसगवली, किशोर चांदेकर, भट व इतर सहकाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. WCL च्या या आरोग्य उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या