Type Here to Get Search Results !

‎हुंड्याची Demand, थेट FIR! पती, दिर व सासूवर गुन्हा

वणी :

‎             माहेरहून ₹5 लाख हुंडा आणण्यासाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देत छळ केल्याप्रकरणी मुकूटबन पोलीस ठाण्यात पती, दिर आणि सासूविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ता. वणी येथील एका २४ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती, दिर व सासू यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


‎         तक्रारीनुसार, विवाहानंतर सातत्याने माहेरहून ₹5 लाख आणण्याची मागणी करण्यात येत होती. पैसे न आणल्यास शिवीगाळ, मारहाण, मानसिक छळ तसेच घराबाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, पतीला दुसरे लग्न करण्यासाठी प्रवृत्त करून तक्रारदार महिलेचा छळ करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.


‎          ९ मे २०२६ रोजी झालेल्या कौटुंबिक वादानंतर मानसिक तणावातून संबंधित विवाहितेने घरात ठेवलेल्या तणनाशकाचे प्राशन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तिच्यावर वणी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढे हे प्रकरण महिला समुपदेशन केंद्र, पांढरकवडा येथे पाठविण्यात आले होते. मात्र समेट न झाल्याने संबंधित विवाहितेने पुन्हा पोलीसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मुकूटबन पोलीसांनी पती, दिर व सासूविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ८५, ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad