Type Here to Get Search Results !

सामाजिक उपक्रमातून संतोष डंभारे यांचा वाढदिवस साजरा

 

वणी :

          वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा सचिव तथा माजी आरोग्य सभापती आणि नगरसेवक संतोष बळीराम डंभारे यांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश देत शनिवारी वणी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप केले. या उपक्रमाद्वारे रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करण्यात आली.


        या कार्यक्रमास माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष विद्या आत्राम, तालुकाध्यक्ष प्रदीप जेऊरकर, शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, संजय पिंपलशेंडे, रवी बेलूरकर, किशन खुंगर, श्रीकांत पोटदुखे तसेच आशु अटारा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले.


        भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार, हितचिंतक आणि नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतोष डंभारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्याचा गौरव करत अशा समाजहिताच्या उपक्रमांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad