Type Here to Get Search Results !

बाल विठ्ठलांच्या नामघोषाने दुमदुमली देशमुखवाडी, लायन्स स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा


वणी : 

           आषाढी एकादशीचे औचित्य साधून लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, देशमुखवाडी येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत श्री विठ्ठल पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत महाराष्ट्राची शेकडो वर्षांची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जपणाऱ्या पंढरपूर वारीचा देखावा साकारला.


         यावेळी विद्यार्थ्यांनी कवायती, वारकरी फुगडी, प्रती पंढरपूर वारी तसेच पालखी सोहळ्याचे आकर्षक सादरीकरण केले. देशमुखवाडीच्या मुख्य रस्त्यावरून निघालेल्या वारकरी दिंडीत "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" च्या जयघोषासह संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या नामघोषात विद्यार्थी तल्लीन झाले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला.


       अनेक विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, माता रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच वारकरी यांचा पारंपरिक वेश परिधान करून पालखी सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त करून दिले.


      यावेळी शाळेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी श्री विठ्ठल, रुख्मिणी माता व पालखीचे पूजन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भक्तिमय सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad