Type Here to Get Search Results !

संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त विजय चोरडिया यांचा आरोग्यदायी उपक्रम; ५४५ रुग्णांची तपासणी


 ‎वणी : 

‎            शिवसेना नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य शिबिर सोमवारी जैताई मंदिर परिसरात उत्साहात व यशस्वीपणे पार पडले.

‎सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात एकूण ५४५ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी ९३ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.

‎         जनसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचे वाटप व वैद्यकीय मार्गदर्शन केले. नेत्र तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

‎        शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर लता मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर व वैद्यकीय पथकाचा विजय चोरडिया यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरामुळे शेकडो गरजू नागरिकांना तज्ज्ञ आरोग्यसेवेचा लाभ मिळाल्याने आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad