Type Here to Get Search Results !

बामणी येथे मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न


बामणी : 

      बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त बामणी येथे आज दिनांक ३० जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


       मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत तब्बल ६४ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या संदेशाला प्रतिसाद देत युवकांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होणार असून रक्तदानाबाबत जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेशही समाजापर्यंत पोहोचला.


      या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. चंद्रकांत देऊळकर, उपाध्यक्ष श्री. देबाशिश सिंग, महामंत्री श्री. रूमदेव देरकर, श्री. प्रकाश मुडपल्लीवार, श्री. अंकित ढवस, श्री. ओम कामडे, श्री. महेश तुराणकर , चंदेल सिंग चंदेल भैया व  हरीशजी शर्मा तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


      यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदान करून समाजसेवेत योगदान द्यावे, असे आवाहन केले.


      या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व ६४ रक्तदात्यांचे, आयोजकांचे व कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले.


"रक्तदान हेच श्रेष्ठ दान – रक्तदान करा, जीवन वाचवा!"

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad