स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सौजन्याने वणी शहरातील गरजू फळ व भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांना पावसाळ्यात दिलासा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या जनसेवेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना अभिवादन केले. समाजातील दुर्बल आणि मेहनतकऱ्या घटकांच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला काँग्रेस नेते संजय खाडे तेजराज बोडे, राजूभाऊ अंकितवार, अशोक चिकटे, उत्तमजी गेडाम, प्रमोद लोणारे, प्रेमनाथ मंगाम, वंदना आवारी, करुणा कांबळे, शामा तोटावर, पलास बोडे, रोहित मालेकर, अलका मोहाळे, अनंता डुभारे, सविता गंजेवार आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे लाभार्थी विक्रेत्यांनी समाधान व्यक्त करत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या