येथे घातक शस्त्रांच्या बळावर दहशत माजविण्याचा संभाव्य डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी खापरी नाका परिसरात सापळा रचून अनिल उत्तम जाधव (वय २९) या सराईत गुन्हेगाराला दोन धारदार तलवारींसह ताब्यात घेतले.
पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कारची झडती घेतली असता डिक्कीत निळ्या रंगाच्या पोत्यात लपवून ठेवलेल्या दोन तलवारी आढळून आल्या. या कारवाईत तलवारी व कार असा एकूण ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्रे कोणत्या उद्देशाने आणली होती व त्यामागे अन्य साथीदार आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या