Type Here to Get Search Results !

Love Story ते Police Case,  विवाहितेच्या तक्रारीने खळबळ

झरी :

‎        तालुक्यातील एका गावात विवाहितेला पती, सासू व सासऱ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


‎       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला वैवाहिक जीवन सुरळीत सुरू असताना नंतर पतीकडून दारूच्या नशेत वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


‎        दि. १४ जून रोजी रात्री पती दारूच्या नशेत घरी आल्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये काचेच्या बाटलीने व काठीने मारहाण झाल्याने महिलेला दुखापत झाली. त्यानंतर सासू व सासऱ्यांनीही मारहाण करून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.


‎       घटनेनंतर पीडित महिला माहेरी गेली व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासू व सासऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

IMG-20260612-105204

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57