Type Here to Get Search Results !

सलूनमध्ये हेअरकट, बाहेर येताच पल्सर कट !


 मारेगाव : 

‎                येथील बसस्थानक परिसरातून सुमारे 60 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली असून, या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

‎            मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रोजमजुरीचे काम करीत असून ते उमरविहीर येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत. 22 मे 2026 रोजी ते आपल्या मित्रांसह झाड कापण्याच्या कामासाठी दुचाकीने मेढोली येथे गेले होते. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर सायंकाळी ते मारेगाव येथे आले.

‎       दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीला मारेगाव बसस्थानकावर सोडल्यानंतर फिर्यादी हे बसस्थानकासमोरील एका हेअर कटिंग सलूनमध्ये गेले. त्यांनी आपली पल्सर 125 सीसी (क्रमांक MH-29-CD-1981) ही दुचाकी दुकानाबाहेर उभी करून चावी गाडीलाच लावून ठेवली होती. काही वेळाने बाहेर आल्यावर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र वाहनाचा काहीच मागमूस लागला नाही.

‎       चोरीस गेलेली दुचाकी काळ्या व लाल रंगाची असून तिचा इंजिन क्रमांक DHXWPJ23070 व चेसिस क्रमांक MD2B68BX5PWJ05568 असा आहे. वाहनाची अंदाजे किंमत 60 हजार रुपये आहे.

‎        फिर्यादीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image