Type Here to Get Search Results !

‎फिटनेस, फोकस आणि पॉझिटिव्हिटी, महिलांनी रंगवला योग दिन


 ‎वणी  : 

‎         आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी वणी येथील दिनदयाल पार्कमध्ये न्यू झुंबा योगा ग्रुपच्या वतीने उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
‎       कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजयाताई दहेकर यांनी योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे सुधारते, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रुपच्या प्रमुख किरणताई नळे यांनी निरोगी जीवनशैली, तंदुरुस्ती आणि महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली.
‎      घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सहभागी महिलांनी एकसमान ड्रेस कोडमध्ये विविध योगासने सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या शिस्तबद्ध आणि आकर्षक सादरीकरणाने परिसरात योगमय वातावरण निर्माण झाले.
‎      न्यू झुंबा योगा ग्रुपच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. महिलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य, सामाजिक जाणीव आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने उपक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावना पोटदुखे, उमदा शेंडे यांच्यासह ग्रुपमधील सर्व महिलांनी मोलाचे सहकार्य केले.

      SK News Channel

     वणी, यवतमाळ आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, क्राईम न्यूज, राजकारण, शेती, शिक्षण आणि ब्रेकिंग न्यूजसाठी

📰 अधिक बातम्या वाचा : 👉 SK News Channel

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad