Type Here to Get Search Results !

स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा ‎


 ‎वडकी  : 

‎         निरंतरम योगअभ्यास मंडळ, वडकी आणि स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ जून २०२६ आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात जनार्दन स्वामी यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

‎         कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व योगशिक्षक तसेच माजी केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जवादे होते. प्रमुख अतिथी म्हणून हरिभाऊ नंदुरकर, वसंतराव बरडे आणि इंद्रकांत घुगरे उपस्थित होते.

‎         यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा सागर यांनी योगाचे आरोग्यदायी महत्त्व विशद करत "योग करा, निरोगी रहा" असा संदेश दिला. विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक योगसाधकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. योग केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर जवादे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व व दैनंदिन जीवनातील योगाचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

‎          भजन, प्रार्थना आणि फलाहाराच्या कार्यक्रमासह योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमात सुमारे ७० योगसाधक, साधिका तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षकवर्गाचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

‎       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद शेख यांनी केले. शंकर मालखेडे, निता फुटाणे, वैभव करडे आणि अक्षय वानखेडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. शेवटी प्राचार्या डॉ. मंजुषा सागर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad