शहरातील शाळा परिसरालगत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सायंकाळी रंगेहात अटक केली. सौरभ खैरे (२५) आणि प्रथमेश गुंडेवार (२०) यांच्याकडून ५.९१ ग्रॅम एमडी ड्रग्ज, रोख रक्कम, मोबाईल आणि मोपेडसह एकूण १.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एसपीएम शाळेमागील परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रग्ज पुरवठ्यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हरे आणि वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोहेकॉ सुनील खंडागळे, सुधीर पांडे, पोकॉ सलमान शेख, रजनीकांत मडावी आणि चालक पोहेकॉ नरेश राऊत यांनी सहभाग घेतला. शाळेजवळ ड्रग्ज विक्री होत असल्याचे उघड झाल्याने नागरिक आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

