Type Here to Get Search Results !

‎‘फुल टाक नाहीतर पैसे नाही’ म्हणत पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण


 ‎मारेगाव :

‎             डीझेल भरण्याच्या पैशांवरून झालेल्या वादातून पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


‎           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेगाव येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत असलेला 25 वर्षीय कर्मचारी 22 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास ड्युटीवर होता. त्यावेळी चार जण ट्रॅक्टरमध्ये डीझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते.


‎         यावेळी संबंधितांनी ट्रॅक्टरमध्ये पूर्ण डीझेल भरण्याची मागणी केली. मात्र पंपावरील डीझेलचा साठा कमी असल्याने कर्मचाऱ्याने केवळ तीन हजार रुपयांचे डीझेल भरून दिले. त्यानंतर डीझेलच्या पैशांवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. कर्मचाऱ्याने पैसे न दिल्यास ट्रॅक्टर जाऊ देणार नसल्याचे सांगितल्याने वाद आणखी चिघळला.


‎        फिर्यादीनुसार, चौघांनी मिळून कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच त्यापैकी एकाने हातातील दगडाने डोक्यावर वार केल्याने तो खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली.


‎      या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad