Type Here to Get Search Results !

वणी अलर्ट!  घरफोडीत सोने-चांदीसह 80 हजारांची रोकड गायब


 वणी : 

‎           शहरातील विठ्ठलवाडी-वडगाव रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सुमारे 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

‎           याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तालीब अय्युब खान (वय 28) हे 22 मे रोजी दुपारी 4 वाजता घराला कुलूप लावून नागपूर येथे गेले होते. त्यानंतर 31 मे रोजी दुपारी 2 वाजता घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कोंडा तुटलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

‎           घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील आलमारीत ठेवलेले 37 ग्रॅम सोन्याचे दागिने, सुमारे 500 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 80 हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे आढळून आले. चोरीस गेलेल्या ऐवजात तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा गोप, सोन्याचा हार, चांदीचे हार, कानातील दागिने, जोडवे, पायल, पैजन आदी वस्तूंचा समावेश आहे.

‎        या प्रकरणी तालीब खान यांच्या फिर्यादीवरून वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(3), 331(4) व 305(अ) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‎     घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर करीत आहेत. परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad