Type Here to Get Search Results !

घरासमोर गोंधळ घालणे पडले महाग; दोघांवर गुन्हा

मारेगाव :


‎         तालुक्यातील खंडणी गावात एका शासकीय डॉक्टरला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‎          पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी हे करंजी येथे शासकीय सेवेत डॉक्टर म्हणून कार्यरत असून ते खंडणी येथे वास्तव्यास आहेत. 24 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास ते घरी एकटे असताना गावातील दोन व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आले.


‎        यावेळी संबंधितांनी डॉक्टरांना घराबाहेर बोलावून अश्लील शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीनुसार, आरोपी काही काळ काठ्या घेऊन परिसरात थांबले होते. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


‎        या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 296, 351(2) व 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image