Type Here to Get Search Results !

‎घरफोडी की ‘Kitchen Shopping’ ? महिलांनी पोत्यात भरलं सगळं ‎

वणी :

‎               शहरातील बेलदारपुरा परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चार महिलांनी घरात प्रवेश करून सुमारे 70 हजार रुपयांचे जुने पितळ, तांबे, जर्मन व स्टीलचे भांडे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‎              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी  राजामणी पृथ्वीराज चव्हाण या दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी निजामाबाद जिल्ह्यातील माहेरी गेल्या होत्या. घराच्या पुढील दरवाजाला कुलूप लावण्यात आले होते, तर मागील बाजूचा दरवाजा तुटलेला असल्याने तो विटा लावून बंद करण्यात आला होता.


‎           दरम्यान, 23 एप्रिल रोजी शेजारच्यांनी फोन करून घराचे मागील दार उघडे असल्याची माहिती दिली. त्यानंतर राजामणी चव्हाण या तत्काळ वणी येथे परत आल्या. घराची पाहणी केली असता आतील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले तसेच घरातील विविध पितळ, तांबे, जर्मन व स्टीलची भांडी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.


‎              चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये जर्मन गंज, पितळी परात, समई, नंदादीप, तांब्याचे गडवे, कास्याचे ताट-वाट्या, कुकर, कढई, मिक्सर, लहान फॅन आदी वस्तूंचा समावेश असून एकूण किंमत सुमारे 70 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


‎          घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास चार अज्ञात महिला पोत्यांमध्ये सामान घेऊन जाताना दिसून आल्या. या महिलांनी मागील तुटलेल्या दरवाजातून घरात प्रवेश करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.


‎       या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात (BNS) 2023 च्या कलम 305(a) व 331(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image