Type Here to Get Search Results !

राजर्षि शाहू महाराज हिंदी विद्यालयाचा 87.5 टक्के निकाल

वणी :

‎          येथील सर्वपरिचित राजर्षि शाहू महाराज हिंदी विद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 87.5 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. जाहीर झालेल्या निकालात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला.
‎        यामध्ये कु. शिवाणी वर्मा हिने 83.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. कु. प्रणाली गाथाडे हिने 78.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. पुर्वा राऊतिया हिने 76.60 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
‎          विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाशजी चचडा, संचालक मंडळ सदस्य मा. विक्रांत चचडा तसेच मुख्याध्यापक श्री. अभय पारखी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या शिक्षकवृंदांनीही विद्यार्थ्यांच्या यशासाठी घेतलेल्या मेहनतीचे समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad