Type Here to Get Search Results !

“Hidden Spot” वर पोलिसांची थेट एंट्री

 

वणी :

‎           शहरातील लालगुडा चौफुली परिसर आणि ज्योती बार गल्ली परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर वणी पोलिसांनी धाड टाकून चार जणांविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई केली. ही कारवाई 24 एप्रिल 2026 आणि 8 मे 2026 रोजी करण्यात आली.


‎            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून एकूण 7 हजार 160 रुपयांचा नगदी मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोपी किसन लोणारे (रा. रामपुरा वार्ड, वणी), अमित किसन घेडांगे (रा. भाग्यशाली नगर, वणी), मंगेश बबन बदखल (रा. भालर) आणि अजय बलेश्वर मांझी (रा. रंगनाथ नगर, वणी) यांचा समावेश आहे.


‎            वणी पोलीस प्रशासनाकडून शहरातील अवैध धंद्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, विशेष पथकांच्या माध्यमातून माहिती संकलन करून अशा जुगार अड्ड्यांवर छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


‎          अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढील काळातही अधिक प्रभावी कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी परिसरातील बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad