Type Here to Get Search Results !

वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा एस.एस.सी. निकाल १०० टक्के


वणी :

‎              येथील वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा एस.एस.सी. (फेब्रुवारी २०२६) परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखत घवघवीत व कौतुकास्पद यश संपादन केले आहे.

‎           या परीक्षेत अनिकेत मधुकर तुराणकर याने ९६.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला. कु. वैष्णवी नितीन भालेराव हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर आरूष सुधीर खराटे याने ९६.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

‎           यंदा शाळेतून एकूण १६३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले. तसेच ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

‎           या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, संचालक शमिम अहमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, वर्ग शिक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad