Type Here to Get Search Results !

Cotton Seed Scam Alert, वणी तालुक्यात 81 पाकिटांचा साठा जप्त ‎


वणी :
‎          तालुक्यातील पळसोनी येथे पोलिसांनी व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत भारत सरकारने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कापूस बियाणे जप्त केले. या प्रकरणी अरुण शंकर भट (वय 45, रा. पळसोनी ता. वणी जि. यवतमाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‎              मिळालेल्या माहितीनुसार, दि. 06 मे 2026 रोजी रात्री 9 ते 9.20 वाजताच्या दरम्यान आरोपी हा स्वतःच्या राहत्या घरी अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा करून विक्री करीत असल्याची माहिती कृषी विभाग व पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.
‎            या कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने विक्रीसाठी ठेवण्यात आलेले एकूण 81 बियाणे पाकिटांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 1 लाख 15 हजार 70 रुपये इतकी आहे. काही बियाण्यांचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी सीलबंद करून पाठविण्यात आले आहेत.
‎           या प्रकरणी आरोपीविरुद्ध बियाणे अधिनियम 1968 मधील कलम 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश चिकराम, पोलीस स्टेशन वणी हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad