Type Here to Get Search Results !

‎“मुली घराबाहेर सुरक्षित आहेत का?” वणीतून पुन्हा मोठा सवाल


 वणी : 

‎             शहरात अल्पवयीन मुलींशी छेडछाड व अश्लील कृत्यांच्या सलग दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्याने शहर हादरले आहे. निरागस चिमुकल्यांवर वाईट नजर ठेवणाऱ्या विकृत प्रवृत्तीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

‎            पहिली संतापजनक घटना बेलदारपुरा परिसरात घडली. घराच्या माडीवर खेळत असलेल्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या चिमुरडीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी राजेंद्र गुलाब चरडे (५६) याला पोलिसांनी अटक केली. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली.

‎           दुसरी घटना निर्गुडा नदी रोड परिसरात घडली. घराच्या पोर्चमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकनाथ रोहणकर (५२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‎              दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रियंका चौधरी व त्यांचे पथक करत आहे.

‎            दरम्यान, शहरात सलग घडलेल्या या घटनांमुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. “चिमुकल्यांवर वाईट नजर टाकणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पोलिसांनीही पालकांना मुलांशी सतत संवाद ठेवून ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याबाबत जागरूक करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image