Type Here to Get Search Results !

स्मॉल वंडर्सचा हायस्कूल वडकी चा एसएससी 100% शशांक येलके 90% गुणांसह प्रथम


राळेगाव :

‎            यवतमाळ जिल्ह्यातील वडकी येथील स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने इयत्ता दहावी (SSC) परीक्षा 2025-26 मध्ये शंभर टक्के निकाल लावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 8 मे रोजी जाहीर झालेल्या निकालात संस्थेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्कृष्ट गुण मिळवत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.


‎        या परीक्षेत शशांक सोमेश्वर येलके याने 90 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मयुर मोरेश्वर ताठे याने 88.40 टक्के गुणांसह द्वितीय, तर जिवितेष आशिष गवळी याने 87.20 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

‎         तसेच इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले असून, वंशिका शैलेश बेलेकर हिने 83.80 टक्के, तर अनुज विजय कांबळे याने 78 टक्के गुण प्राप्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे यश, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे योग्य गुणवत्ता प्राप्त करता आली असे पालकांनी मत व्यक्त केले

‎            या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या डॉ. मंजुषा सागर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच अहमद शेख, विजय फुलकर, वैभव करडे, शंकर मालखेडे व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad