Type Here to Get Search Results !

“विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने वणीत नव्या शिवसैनिकांचा जल्लोष” ‎

वणी :
‎         वणी विधानसभा (वणी, झरी, मारेगाव) तालुक्यातील महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी नुकताच Shiv Sena पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे पक्षाचे प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेत त्यांनी शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला.


‎        या प्रवेशामध्ये माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, वसंत जिनिंगचे माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते आशिष खुलसंगे, माजी शिवसेना शहराध्यक्ष राजू तुराणकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे तसेच काही नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.


‎         पक्षात प्रवेश केलेल्या या पदाधिकाऱ्यांचे शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने दिनांक १ एप्रिल रोजी सायंकाळी वणी येथे ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीसह जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकस्थळी, साईबाबा चौक येथे त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
‎              यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवसैनिकांनी "जय भवानी, जय शिवाजी"चा जयघोष करत वातावरण दणाणून सोडले. त्यानंतर जवळील श्री जैताई माता मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आले व सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image