Type Here to Get Search Results !

स्वर्णलीला स्कूलमध्ये 'उडान' वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


 वणी :

‎        येथील नामांकित अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'उडान' या शीर्षकाखाली भव्य वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

‎          विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या अंगी दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. वाद्यवृंद सादरीकरण, समूह व एकल गीते, तसेच आकर्षक नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाला रंगत आणली. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच केले. कार्यक्रमाला पालक व कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


‎        कार्यक्रमासाठी पंचायत समिती वणीचे गटविकास अधिकारी. किशोर गज्जलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे तसेच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

‎         अल्फोर्स ग्रुप ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेसचे अध्यक्ष डॉ. व्ही. नरेंद्र रेड्डी, प्राचार्या अन्नपूर्णा पवन व उपप्राचार्य विक्की मोहानी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.

‎         संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अल्फोर्स ग्रुप ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेसचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad