Type Here to Get Search Results !

‎महावीर जयंती निमित्त वणीत भव्य शोभायात्रा, शहरात भक्तिमय वातावरण

 

वणी : 

‎           महावीर जयंतीच्या पावन निमित्ताने वणी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत जैन समाजासह विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. शोभायात्रेची सुरुवात शहरातील जैन मंदिरातून करण्यात आली. भगवान महावीरांच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करून ती रथावर विराजमान करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि 'महावीर स्वामी की जय'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


‎            कार्यक्रमादरम्यान महावीर स्वामींच्या अहिंसा, सत्य आणि करुणेच्या संदेशाचा प्रसार करण्यात आला. तसेच समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहनही करण्यात आले. या शोभायात्रेत स्थानिक आमदार संजय देरकर, शिवसेना जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया, महाविर कटारिया, खिवंसरा, राजेश बतरा, विनोद ढुमने, मनिष बतरा, अभय झाबक इत्यादीं सहभागी झाले होते.

‎           या शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी जैन समाजातील पदाधिकारी, युवक मंडळे आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad