वणी :
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राजूदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना यवतमाळ जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांच्या नेतृत्वात वणी तालुक्यात भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात विविध पक्षांतील ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत पक्षाशी निष्ठा व्यक्त केली. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला विनोद मोहितकर, आशिष खुलसंगे, किशोर नांदेकर, प्रसाद ठाकरे, विशाल किन्हेकर, बाळू चेडे, मनीष सुरावार, शुभम गोरे, राजू देवडे, संगीता मुरस्कर, वसुधाताई ढगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या पक्षप्रवेशामुळे वणी तालुक्यात शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून आगामी स्थानिक राजकारणात पक्षाला याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या