Type Here to Get Search Results !

भाजपाचा ऐतिहासिक विजय, वणीत बोदकुरवार यांच्या नेतृत्वात जल्लोष ‎

वणी  :

‎                पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर वणी शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या आनंदोत्सवात माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांसोबत विजय साजरा केला.


‎            छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ५:३० वाजता झालेल्या कार्यक्रमात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला. बोदकुरवार यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.


‎           बोदकुरवार यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत हा विजय त्यांच्या मेहनतीचा व जनतेच्या विश्वासाचा असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सर्वांना एकत्र ठेवत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला.


‎              यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावत जल्लोष केला. ‘झालमुरी’चा आस्वाद घेत साधेपणातून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. बोदकुरवार यांच्या नेतृत्वामुळे वणीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


           यावेळी माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष विद्या आत्राम आणि उपाध्यक्ष राकेश बुगेवार यांचीही उपस्थिती होती. भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. निलेश चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad