Type Here to Get Search Results !

‎विश्वासातून विश्वासघात, दोन मुलांच्या आईवर मानसिक छळ


 ‎वणी : 

‎         येथील ३६ वर्षांची विवाहित महिला असून तिला दोन मुले आहेत. तिची सोशल मीडियावरून पुसद येथील ३० वर्षांच्या युवकाशी ओळख झाली. सुरुवातीला गप्पा सुरू झाल्या, नंतर जवळीक वाढत जाऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. हे संबंध सुमारे दोन वर्षे चालू होते.

‎          यानंतर महिलेने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवकाने तिला धमकावण्यास सुरुवात केली. दोघांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला पुन्हा नात्यात येण्यासाठी दबाव टाकू लागला. तसेच “नातं तोडलंस तर मी जीव देईन आणि तुझं नाव लिहीन” अशी धमकी देत तिचा मानसिक छळ केला.

‎          या त्रासाला कंटाळून महिलेने २७ एप्रिल रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ३५१(२)(३) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला पुसद येथून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad