Type Here to Get Search Results !

विश्वास मैत्रीचा, ३५ वर्षांनंतर स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न ‎


वणी :

‎             विवेकानंद विद्यालय, वणी येथील सन १९९१–९२ मधील इयत्ता १० वी (ड) च्या विद्यार्थ्यांचा ‘विश्वास मैत्रीचा’ हा स्नेह मिलन सोहळा दि. ३० एप्रिल २०२६ रोजी नांदेपेरा रोडवरील राजवाडा पॅलेस येथे उत्साहात पार पडला.


‎                  तब्बल ३५ वर्षांनंतर एकत्र येण्याचा आनंद अनुभवण्यासाठी सुमारे ४० माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी आपल्या आयुष्यातील गोड-कडू अनुभव, सुख-दुःखांची देवाणघेवाण करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.


‎            ‘विश्वास मैत्रीचा’ या नावाला साजेसा असा परस्परांवरील विश्वास आणि जिव्हाळा या सोहळ्यात स्पष्टपणे जाणवत होता. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


‎          या कार्यक्रमाचे आयोजन शेखर सातपुते यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. महेश ढेंगळे यांनी प्रभावीपणे केले.


‎           सोहळ्यास संगीता कोंगरे, वासंती थेरे, सुनिता बदखल, वैशाली बुट्टेकर, ज्योती जोशी, वैशाली बोडखे, दिपाली थेरे, उज्वला गोवारदिपे, माधुरी हेपट, शारदा ठोंबरे, सुनंदा बोर्डे, तसेच शेखर सातपुते, महेश ढेंगळे, दत्ता निमेकर, संतोष भेले, शैलेश जुनघरी, राजू जुमनाके, सचिन अंडरस्कर, अशोक नगराळे, शुधोधन साठे, मोहम्मद शेख, शकील जब्बार, हेमंत सहारे, विनोद महसेवार, रामराव निमजे, अजय नांदेकर, विनोद मोहुर्ले, संजय सूर, सुधीर मोटरवार, सुनील मडावी, अजय मुळे, भास्कर कोन्डमवार, विजय ठाकरे आदींनी उपस्थिती दर्शविली.


‎            कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी एकमेकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आनंददायी वातावरणात झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad