वणी :
वणी पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या कारवाईत एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थासह दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. ही कारवाई देशमुख वाडी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता ओमप्रकाश पेंडकर (सहा. पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 18 एप्रिल रोजी दुपारी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल दिलीप ठाकुरवार (वय 40) व प्रितम लिलाराम केशवाणी (वय 44) अशी आहेत.
झडतीदरम्यान आरोपींकडून एकूण 21 ग्रॅम 18 मिलीग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय मोबाईल फोन, दुचाकी (अॅक्टिव्हा) व नगदी रक्कम असा एकूण 2 लाख 30 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान राहुल ठाकुरवार याने सदर अंमली पदार्थ हा सोनू जैयसवाल याचा असून त्याच्या सांगण्यावरून विक्री करत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8(क), 21(ब), 29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या