Type Here to Get Search Results !

वणी लायन्स ज्युनिअर विज्ञान कॉलेजचा एचएससी निकाल ९४.४४ टक्के

 वणी : 

‎           येथील वणी लायन्स इंग्लिश मिडीयम (विज्ञान) ज्युनिअर कॉलेजचा एच. एस. सी. फेब्रुवारी २०२६ परीक्षेचा निकाल ९४.४४ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


‎             या परीक्षेत कु. मानसी भारत लिपटे हिने ७९.८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. कुमुदिनी हेमंत जोगी हिने ६३.३३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर रोशन तुकाराम माथनकर याने ६१.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.


‎            यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, शाळेचे संचालक शमिम अहेमद, नरेंद्र बरडीया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image