वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी देशाच्या जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. त्यांनी स्वतः स्व-गणना (Self Enumeration) पूर्ण केल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाने ही प्रक्रिया घरबसल्या सोप्या पद्धतीने पूर्ण करावी, असे नमूद केले.
बोदकुरवार म्हणाले की, “भारताच्या जनगणनेत अचूक माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच माहितीच्या आधारे शासन विविध योजना आखते आणि देशाच्या विकासाची दिशा ठरते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने स्व-गणना पूर्ण करावी.”
त्यांनी पुढे सांगितले की, स्व-गणना ही केवळ एक प्रक्रिया नसून देशासाठीचे योगदान आहे. नागरिकांनी जागरूक राहून अचूक माहिती नोंदवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी, “चला, जागरूक नागरिक बनूया आणि स्व-गणना पूर्ण करून देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलूया,” असे आवाहन त्यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या