Type Here to Get Search Results !

हॉट ट्रॅक’वर पाठलाग, आरोपी अखेर गाठला

मारेगाव : 

‎                स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली. नथ्थु नागू कुरकुटे (वय ३०, रा. मोहदरी, ता. उमरखेड) हा मारेगाव पोलीस ठाण्यातील घरफोडी प्रकरणात फरार होता.


‎         १ मे रोजी पुसद–उमरखेड मार्गावरील कोपरा फाटा येथे तो फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.


‎         चौकशीत आरोपीने आणखी एका घरफोडीची कबुली दिली असून या कारवाईत एकूण ९ लाख ३० हजार ३०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


‎         ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image