Type Here to Get Search Results !

वणीमध्ये मराठी विज्ञान परिषदेची वार्षिक सभा व गौरव समारंभ

वणी :

‎              मराठी विज्ञान परिषद वणी विभाग (संलग्न म.वि.प. मुंबई) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व बक्षीस वितरण समारंभ येथील श्रीमती नुसाबाई चोपणे विद्यालयात उत्साहात पार पडला.


‎          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी विभागाचे अध्यक्ष प्रा. महादेव खाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यवाह लक्ष्मण ईददे, कार्याध्यक्ष प्रशांत गोडे, कोषाध्यक्ष संजय देवाळकर व स्नेहलता चुंबळे उपस्थित होते.


‎       प्रारंभी कार्यवाह लक्ष्मण ईददे यांनी अहवाल वाचन करताना राष्ट्रीय गणित दिनानिमित्त श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच विविध शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन, गणेशोत्सव जनजागृती, दिवाळीतील फटाका प्रदूषण, होळी व रंगपंचमी निमित्त नैसर्गिक रंगनिर्मिती अशा विविध सामाजिक व शालेय उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.


‎           यावेळी २०२५-२६ या वर्षात आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. खुला गट ‘अवयव दान’ व विद्यार्थी गट ‘मोबाईलपासून मैदानाकडे’ या विषयांवर स्पर्धा घेण्यात आली होती. वणी विभागातून कु. आरोही प्रमोद ढेंगळे (शि.प्र.मं. विद्यालय, वणी) हिने प्रथम, कु. श्वेता कैलास उईके हिने द्वितीय, तर कु. सौंदर्या सुरेश कुळसंगे (आदर्श हायस्कूल, वणी) हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच कु. संजना हेमंत मोहितकर (विठ्ठल पा. मांडवकर विद्यालय, तेजापूर) व कु. नव्या शंकर खामनकर (राष्ट्रीय विद्यालय, राजूर कॉलरी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.


‎          कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला विजय गंधेवार यांनी विज्ञान गीत सादर केले. प्रास्ताविक संजय देवाळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहकार्यवाह भारत गारघाटे यांनी केले.


‎         कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक विनोद जेनेकर, प्रकाश गारघाटे, सुनील कोंगरे, डी. जे. गोहोकार, वैजनाथ खडसे, अश्विनी ढेंगळे, धुंडीबाल धानोरकर तसेच श्रीमती नुसाबाई चोपणे विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad