Type Here to Get Search Results !

वणी पब्लिक ज्यु. कॉलेजचा १२ वी परीक्षेत उल्लेखनीय निकाल

वणी :

‎            येथील सर्वपरिचित वणी पब्लिक ज्यु. कॉलेजने बारावीच्या परीक्षेत यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार, विज्ञान शाखेचा 98.18 टक्के तर वाणिज्य शाखेचा 70 टक्के निकाल लागला असून महाविद्यालयाचा एकूण निकाल 93 टक्के इतका लागला आहे.

‎              विज्ञान शाखेत कु. हर्षदा राजू आवारी हिने 85.67 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. विनय वासुदेव पाटीदार याने 81.50 टक्के गुणांसह द्वितीय तर कु. सिद्धी पुरुषोत्तम गोहोकार हिने 81 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

‎              वाणिज्य शाखेत पार्थ अजय लाल याने 75.50 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. श्रावणी संजय वाळके हिने 73.67 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला.

‎         या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाशजी चचडा, संचालक मंडळ सदस्य मा. विक्रांत चचडा तसेच प्राचार्य आष्लेषा जेनेकार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image