शेतकरी व कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त शनिवार, दि. 23 मे 2026 रोजी वणी येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अपघात, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांमुळे रक्ताची गरज सातत्याने भासत असते. अशा परिस्थितीत एका व्यक्तीच्या रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, वृद्धाश्रमातील गरजूंना उपयुक्त साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. याच सत्रात ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप केले जाणार आहे.
संध्याकाळी 6 वाजता डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शहरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके राहणार आहेत. संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे हे या कार्यालयाचे संचालक आहेत. सामाजिक कार्यासोबतच विकासाभिमुख उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने हा नवीन व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या