Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी टोळी अखेर पकडली

 ‎वणी :

‎           शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तिघा आरोपींना अटक केली. आरोपींकडून ७० हजार रुपयांची रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

‎        सीताराम भिसे, सुनील साळुंखे व संजय वायकर अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वणीसह इतर भागांमध्ये बकरी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेल्या बकऱ्या आठवडी बाजारात विक्री केल्या जात असल्याचे तपासात समोर आले.

‎        दरम्यान, या प्रकरणातील सचिन वायकर हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे व एलसीबी पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad