Type Here to Get Search Results !

‎दुर्घटनाग्रस्त कोळसा खाणीची काँग्रेसकडून पाहणी


 वणी : 

‎            उकणी येथील कोळसा खाण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिनांक 11 मे 2026 रोजी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खाडे यांनी प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी WCL प्रशासनाला धारेवर धरत दुर्घटनेबाबत जाब विचारला तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
‎              परिसरातील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिक व त्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. वणी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणीचे जाळे असल्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात आली.


‎            तसेच दुर्घटनेत बाधित झालेल्या खाणकामगार आसुटकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. उकणीसह पिंपळगाव गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न, उर्वरित जमीन संपादन तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरी देण्याबाबतही प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी मुख्य महाप्रबंधक खन्ना साहेब, उपक्षेत्रीय प्रबंधक स्वामी साहेब तसेच WCL प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‎             या पाहणी दौऱ्यात WCL TSC सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे, प्रमोदभाऊ वासेकर, राजीव अंकितवार, अशोक चिकटे, विकेश पानघाटे, नंदू आसुटकर साहेब, बंडुभाऊ खीरटकर, मनोज खाडे, दादा खेडेकर, सुभाष ढवळे तसेच उकणी गावासह परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image