Type Here to Get Search Results !

बुद्धांचे विचार मानवकल्याणासाठी प्रेरणादायी -  प्रा. पुरुषोत्तम पाटील ‎ ‎

वणी :

‎           डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, वणी यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ८.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

‎             यावेळी प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तथागत भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान हे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. बुद्धांनी अंधश्रद्धेपेक्षा विवेक, विज्ञान आणि सत्य यांना महत्त्व दिले. “मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, तर विवेकाच्या कसोटीवर तपासून सत्य आढळल्यासच स्वीकारा,” हा बुद्धांचा संदेश आजही समाजाला विज्ञानवादी दृष्टिकोन देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.


‎            कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे प्रा. पुरुषोत्तम पाटील, संजय तेलंग, रामदास कांबळे, विजय नगराळे, नरेश तेलंग, पुंडलिक पथाडे, प्राचार्य संजय तेलतुंबडे, वसंतराव पडवेकर, रेणुका दास गजभिये, वसंत नगराळे, दिगंबर पुनवटकर, मंगल तेलंग, कवडू जीवने, विवेक गाडगे, गंगाधर रामटेके, अरुण बांगडे, खिवराज भगत, अरविंद टिपले, गौतम टिपले, विठाबाई कोंडावार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad