Type Here to Get Search Results !

समजावायला गेला, पण झाला हल्ला; युवक रक्तबंबाळ

मारेगाव :

‎                येथे घरगुती वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवक हा आई व सावत्र वडिलांसोबत राहत असून रोजमजुरीचे काम करतो. सावत्र वडील दारूच्या नशेत वारंवार घरात वाद घालत असल्याचे समोर आले आहे.


‎           १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास, युवक कामावर असताना त्याच्या आईने फोन करून घरात सुरू असलेल्या वादाची माहिती दिली. त्यानंतर युवक घरी परतला असता, आरोपी दारूच्या नशेत आईसोबत भांडण करत होता.


‎            युवकाने समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कमरेचा पट्टा काढून त्याच्या डोक्यावर मारहाण केली. पट्ट्याच्या लोखंडी बक्कलमुळे डोक्याच्या मागील बाजूस जखम झाली. तसेच आरोपीने आई व मुलाला घराबाहेर जाण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.


‎         या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 352, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad