Type Here to Get Search Results !

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वणीत उद्या भव्य रक्तदान शिबीर (आमदार देरकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन) ‎

वणी :

‎              महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी विधानसभा पक्षातर्फे उद्या, शुक्रवार १ मे २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणी येथील टिळक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबीर पार पडणार असून, याद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


‎            या शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी  नितीनकुमार हिंगोले उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार निखिल धुळधर, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश दळवी, गटविकास अधिकारी किशोर गजलवार, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, अभियंता केतनजी परतानी, मुख्याधिकारी सचिनजी गाडे, पोलीस निरीक्षक सुजाता हिरकर, शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्रजी गायकवाड आणि जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांसह प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


‎           'करा रक्तदान, वाचवा अनेकांचे प्राण' आणि '८० टक्के समाजकारण' या बाळासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी या महा-रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. रक्ताची एक बाटली कोणाचे तरी प्राण वाचवून त्यांना जीवनदान देऊ शकते, त्यामुळे वणी तालुक्यातील सर्व शिवसैनिक, तरुण-तरुणी आणि विद्यार्थी मित्रांनी या राष्ट्रीय कार्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी विधानसभा पक्षातर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वणी शहरात मोठ्या प्रमाणावर जनहितार्थ रक्ताचा साठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad