Type Here to Get Search Results !

निवलीत रात्रीची संशयास्पद हालचाल; पुढे उघड झाला धक्कादायक प्रकार

वणी :

‎           तालुक्यातील मौजा निवली येथे वीज वितरण व्यवस्थेशी संबंधित एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. महावितरणचे 11 केव्ही लोखंडी खांब थेट जमिनीतून उपसून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याचे उघड झाले.
‎           ही घटना 17 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 8.30 ते 9.00 वाजण्याच्या दरम्यान निवली ते तरोडा रोड परिसरात घडली. अज्ञात व्यक्तींकडून खांब खोदून काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच सहाय्यक अभियंता सिडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
‎            अचानक झालेल्या या कारवाईमुळे चोरट्यांमध्ये गोंधळ उडाला. दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले, तर एक महिला व एक पुरुष यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
‎         घटनास्थळावरून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी तसेच लोखंडी खांब उपसण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना ताब्यात घेतले.
‎       या घटनेमुळे महावितरणचे नुकसान झाले असून, (BNS) 2023 अंतर्गत कलम 303(2) व 62 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू असून, या प्रकारामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad