तालुक्यातील एका गावात पानटपरीवर बसलेल्या मजुरावर वृद्ध व्यक्तीने कु-हाडीच्या दांड्याने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास एक मजूर गावातील पानटपरीवर बसला होता. त्यावेळी गावातीलच एक वृद्ध व्यक्ती दारूच्या नशेत हातात कु-हाड घेऊन तेथे आला आणि आरडाओरडा करू लागला. काही वेळानंतर त्याने संबंधित मजुराच्या पाठीमागून येत कु-हाडीच्या दांड्याने कानाजवळ मारहाण केली.
या हल्ल्यात मजूर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेवेळी काही नागरिक उपस्थित होते. फिर्यादीची तक्रार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या