Type Here to Get Search Results !

संशयावरून कारवाई; काही तासांत दोन वेगवेगळे गुन्हे उघड

 
वणी : 

‎            गोकुळनगर परिसरात शुक्रवारी पहाटेपासून काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर उलगडला एक धक्कादायक प्रकार.

‎           दि. 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी अचानक कारवाई करताच दोन तरुणांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात मांस आढळून आले. चौकशीअंती हे मांस बंदी असलेल्या गोवंश जातीचे असल्याचे निष्पन्न झाले. सलमान शकिल शेख (25) व नावेद शेख रियाज (22, दोघेही रा. खडबडा मोहल्ला, वणी) यांच्याकडून तब्बल 90 किलो 500 ग्रॅम गोमांस जप्त करण्यात आले. या मालाची किंमत सुमारे 18,100 रुपये असल्याचे सांगितले जाते.

‎          ही कारवाई सुरू असतानाच, काही तासांतच त्याच परिसरात आणखी एक संशयास्पद हालचाल पोलिसांच्या नजरेस पडली. सकाळी 9 वाजता करण्यात आलेल्या दुसऱ्या छाप्यात अब्दूल माजिद अब्दुल सत्तार (35, रा. मोमिनपूरा, वणी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 39 किलो गोमांस (किंमत 7,800 रुपये) तसेच विना नंबरची ज्यूपीटर मोपेड (किंमत 20,000 रुपये) असा एकूण 27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

‎         दोन्ही घटनांमध्ये आरोपी हे गोमांस विक्रीसाठी बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, फिर्यादी विशाल पांडुरंग दुधबळे यांच्या जबानीवरून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image