शास्त्रीनगर परिसरात आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. विजेचा धक्का लागून एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौ. छाया नंदकिशोर घुले या आपल्या घरात मोटारने पाणी भरत असताना अचानक विजेचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या