Type Here to Get Search Results !

‎तब्बल 34 वर्षांनंतर एकत्र आलेत शालेय विद्यार्थी

वणी : 

‎          शाळेची घंटा वाजताच प्रार्थना झाली. वर्गात येण्यापूर्वी प्रवेशद्वारावरच शिक्षकांचं थाटात स्वागत झाले. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्गात गोळा झालेत. कोणी पुढील शिक्षणासाठी गाव सोडले. कोणी नोकरी, व्यवसाया निमित्त खूप दूर गेले होते, काही तिथेच स्थायिक झालेत. सत्र १९९१-९२ चे दहावीचे विद्यार्थी रविवारी विवेकानंद विद्यालयात स्नेहमिलनासाठी एकत्र झालेत. 
‎         तब्बल ३४ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचा ओलावा मात्र कायम राहिला. शाळेत वर्गमित्रांशी जुळलेली नाळ तशीच राहावी... सर्वांनी पुन्हा एकदा भेटावे... एकमेकांबाबत जाणून घ्यावे... हितगुज करावे यासाठी विवेकानंद विद्यालयातील वर्गमित्रांचा स्नेहमिलनसोहळा रंगला.
‎      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण सा. गंगशेट्टीवार होते. मार्गदर्शक म्हणून हरीभाऊ चिखले, वामन घु. मिलमिले,अनंत एकरे, गणपतराव पारखी, तिलोत्तमा भेदोडकर, स्नेहलता चुंबळे भास्कर काळे,  प्रदीप सुंकुरवार, दि. ह .लोणारे, प्रे. रा. राठोड, नवनाथ नगराळे, रामकृष्ण बोबडे, दिलिपराव आस्कर, आदी शिक्षक उपस्थित होते. 
        ‎ सर्व शिक्षकांचा सत्कार संतोष बेलेकर, मंगेश करंडे, वैभव आत्राम, योगेश खिवंसरा, अमित कळमकर, राहुल रेगुंडवार, विनोद कापसे, सारंग काळे, अविनाश दोडके, अमर देवाळकर, सचिन मत्ते, ताराचंद घारापुरे, जितेश खाडे, विजय गाडगे, ईश्वर मालेकर, अनिल मस्के, संतोष सूर, सरिता दुबे तिवारी, योगेश खारकर, संतोष मत्ते, राजूकाळे, राजेश मांडवकर, उमाकांत बदखल, प्रमोद झिले, विकास वैद्य आदींनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 
‎        सर्व शिक्षकांनी सत्काराला उत्तर देत मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी यानिमित्त शाळेला एक भेटवस्तू प्रदान केली. याप्रसंगी दिवगंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मंगला गोहणे भोयर आणि सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी केले. 
‎       प्रास्ताविक सुलक्षणा भोंगळे यांनी केले. अमित कळमकर ह्यांनी अतिथींचा परिचय करून दिला. आभार मंगेश करंडे यांनी केले. व्यवस्थापन प्रमुख संतोष बेलेकर होते. आयोजनासाठी कविता मानकर, अंजू येवले, शारदा ढेंगळे, कविता दिकुंडवार, किरण चिंडालिया, प्रकाश काशीकर, अनघा कोंडावर, दुर्गा वाटमोडे, भारती शर्मा, राधा थेरे  यांच्यासह सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad