मारेगाव :
बोर्डा ते वेगाव या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेत रस्त्याच्या कामास मंजुरी दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दीर्घकाळापासून या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली होती. याबाबत मनसेच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने विभाग अध्यक्ष लक्ष्मण उपरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला.
लक्ष्मण उपरे यांनी सांगितले की, “हे यश सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही पुढेही लक्ष ठेवणार आहोत.”
या आंदोलनात प्रवीण दुमारे, नितीन ढेंगळे, उमेश झाडे, प्रतीक पाणघाटे, मनोज मते, सोनू ढेंगळे, शंकर ढेंगळे, दिनेश डोंगे, भूषण खानकर, प्रशिल घागी, सुरेश दुःखोड, रोशन थाटे, महेश थाटे आदी कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या