Type Here to Get Search Results !

चिखलगावात नेत्र व आरोग्य शिबिर; सुनील कातकडे यांची प्रभावी भूमिका

वणी :
‎           चिखलगाव येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद शाळा, चिखलगाव येथे शिवसेना (उबाठा) व स्व. केशवराव कातकडे बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामागे उपसरपंच सुनील कातकडे यांचा विशेष पुढाकार व नियोजनबद्ध नेतृत्व ठळकपणे दिसून आले. सरपंच सौ. रूपाली सुनिल कातकडे यांच्या सहकार्याने त्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.

‎        या शिबिराचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते पार पडले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, डॉ. महेंद्र लोढा, गणपत लेडांगे, नगरसेवक सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

‎       उपसरपंच सुनील कातकडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिबिराचे नियोजन, डॉक्टरांशी समन्वय, रुग्णांची नोंदणी व गावकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे पार पाडले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात एकूण ७९५ रुग्णांनी सहभाग नोंदविला.

‎          महात्मे नेत्र पेढी, नागपूर, लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, राजुर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये ५५० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून २०० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया ३, ५ व ७ जानेवारी रोजी होणार असून, शस्त्रक्रियेनंतर १५ जानेवारी रोजी चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
‎         गावाच्या आरोग्यविषयक गरजा ओळखून अशा प्रकारचा मोठा उपक्रम राबविल्याबद्दल उपसरपंच सुनील कातकडे यांचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे आणि कार्यतत्परतेमुळे चिखलगावमध्ये आरोग्यसेवेचा एक आदर्श निर्माण झाला आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व आयोजकांचे मनापासून कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image