Type Here to Get Search Results !

‎एल.एल.एम.मध्ये सुवर्णयश; ॲड. पूजा मत्ते यांना गोल्ड मेडल

चंद्रपूर : 

         शांताराम पोटदुखे लॉ कॉलेज, चंद्रपूर येथे दिनांक ३० मार्च २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला.
‎          एल.एल.एम. (LL.M.) अभ्यासक्रम २०२२-२३ मध्ये कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीच्या जोरावर ॲड. पूजा देवराव मत्ते यांनी प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. हे सुवर्णपदक डॉ. कापसे मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
‎      या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एजाज शेख सर, चंद्रपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विक्रम टंडन सर, तसेच इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी ॲड. पूजा मत्ते यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad